सावधान वणीकरांनो!!!!! मास्क न वापरणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यास स्वतः वणी पो .नी वैभव जाधव ,सपोनी माया चाटसे त्यांची चमु चौकात सज्ज
★अतिमहत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर निघू नये – सपोनि मायाताई चाटसे
वणी (17 .एप्रिल ) :- कोरोना व्हायरसचा (कोविड19)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तरीही अनेक नागरिक या सूचनांचं पालन करताना दिसत नाही. कडक निर्बंध लागू असतांना सुद्धा लोक मास्कविना आणि विनाकारण फिरत आहे.
.
दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना काही नागरिक या आदेशाकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात विना मास्क, विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्या वाहन चालक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे .
दि. 17 एप्रिल रोजी सर्व लोकांना आधी आज सूचना देऊन व त्यांची नाम नोंदणी करुन त्यांना सोडण्यत आले.
उद्यापासून दंड वसूल करण्यात येणार असे स्पष्ट सांगितले. तर आज मास्कविना, अतिमहत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर निघू नये असे शहरातून पोलीस रस्त्यावर लोकांना माहिती देत आहेत.
कारवाई शहरातील मुख्य चौकात केली जात आहे. या मोहिमेत वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचा मार्गदर्शनात, सहायक पोलिस निरीक्षक मायाताई चाटसे,शेखर वांढरे,

सदाशिव मेघावत,सुदर्शन वानोडे, प्रभाकर कांबड़े ,वाहतूक शाखेचे सपोनि नंदकुमार अहिरे ,रवि सलामे व इतर पोलीस कर्मचारीवर्ग उपस्थित होते.



