डॉ.बाबासाहेब यांच्या जयंती निमित्या विविध कार्यक्रम -प्रवास सोशिअल वेलफेअर फाउंडेशन सिंदेवाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून पे बँक टू सोसायटी च्या संकल्पनेतून प्रवास सोशिअल वेलफेअर फाउंडेशन सिंदेवाही द्वारा आयोजित रुग्णांना फळे व मास्क वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने मा. नागसेन दहिवले एन. डी. क्लिनिकल लेबॉरेटरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात प्रथमी बाबासाहेब यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तदनंतर ग्रामीण रुग्नालय सिंदेवाही येथे फळे तसेच मास्क चे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला मा. सिद्धार्थ कोवले (व्यवस्थापक) विदर्भ ग्रामीण बचत निधी सिंदेवाही, तसेच मा. नागसेन घोनमोडे, मा. अमित खोब्रागडे मा.कुणाल उंदीरवाडे यांच्या समवेत प्रवास सोशिअल वेलफेअर फाउंडेशन सिंदेवाही चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



