भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा तर्फे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
वणी (14 एप्रिल ):- तालुक्यातील वणी येथील चौकात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती भारतीय जनता पार्टी वणी विधानसभाच्या वतीने अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात ठेवून प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवून

अत्यंत साध्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथमतः
महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार भाजपचे जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री रवि बेलुरकर ,तालुका अध्यक्ष गजानन विधाते, शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




