मुख्यमंत्र्यांनी लावले उद्यापासून निर्बंध
🌟मुख्यमंत्र्यांनी खालील निर्बंध घातले आहे.
⭐उद्या रात्री ८ वाजेपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी
🌟शिवभोजन एक महिना मोफत
🌟अतिआवश्यक वगळता सर्व दुकाने बंद राहतील
🌟बांधकाम मजुरांना १५०० रुपये मदत म्हणून मिळेल
🌟नोंदणीकृत रिक्षाचालकांना १५०० रुपये मदत म्हणून मिळेल
🌟गरीब व गरजूंना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मिळणार
🌟राज्यात १४ तारखेपासून रात्री ८ वाजतानंतर १४४ कलम लागू
🌟हॉटेल धारकांना फक्त पार्सल देता येणार
मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार, महाराष्ट्रात उद्या संध्याकाळी 8 वाजेपासून कलम 144 लागू करण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील 15 दिवस राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, पुढील 15 दिवस राज्यातील सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील. तसेच, बस, लोकल सेवांसह अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे. रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, जनावरांचे दवाखाने, बस, ऑटो, राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मागच्या वर्षी कोरोना चाचणी केंद्र 1-2 होते, पण आता 523 केंद्र आहेत. पण, चाचण्यांचे रिपोर्ट येण्यास वेळ लागत आहे. यंत्रणावर भार आलाय. यंत्रणांची क्षमता असते, रोज चाचण्यांची संख्या वाढवतोय. 85 हजारावरुन सव्वा दोन लाख चाचण्या होत आहेत. कोव्हिड सेंटर 2600 होती, ती आता 4 हजारावर गेलेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अशा कठीण काळात मी सर्वांशी चर्चा करतोय, पण निष्पन्न काहीच होत नाहीय. सध्याचा जो काळ आहे, ही परिस्थिती हातातून गेली तर नंतर काहीच होणार नाही. सध्या 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होते. हा आरोग्यासाठीच वापरला जातो. आज 950 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातोय. औषधे जिथून मिळतील तिथून घेतोय. केंद्राकडे विनंती केली. रोजच्या रोज त्यांच्याकडे अहवाल जात आहे. एकही मृत्यू किंवा रुग्ण लपवत नाहीत. सर्व परिस्थितीला तोंड देतोय. त्यामुळे पंतप्रधानांना ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला आहे. अधिकचा ऑक्सिजन इतर राज्यातून देण्यासाठी परवानगी मागितली आहे. ईशान्येकडील राज्यातून परवानगी दिलीय, ती हजारो किमीवर आहेत.
ते पुढे म्हणाले, सध्या राज्यातील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. पंतप्रधानांनी टीका महोत्सव करा म्हटले, मी म्हणतो फक्त चार दिवस कशाला, अनेक दिवस करू. आम्ही लसीकरण वाढवत आहोत. आताची लाट मोठी आहे. लसीकरणानंतर लगेच प्रतिकारशक्ती येत नाही. पुढची लाट येण्यापूर्वी लसीकरण आवश्यक आहे. येत्या काळात ब्रिटनप्रमाणे लसीकरण प्रचंड वाढवावा लागेल. पहिली लाट ही काहीच नव्हती. दुसरी लाट भयानक आहे. त्यामुळे तिसरी लाट कशी असेल सांगता येत नाही.
राज्यात ऑक्सीजनची कमतरता आहे. रस्त्याने ऑक्सिजन आणणे कठीण आहे. हवाई मार्गे ऑक्सिजन मिळत असेल तर ती परवानगी देऊन एअरफोर्सने ऑक्सिजन पाठवा, अशी केंद्राला विनंती केली आहे. ऑक्सिजन, औषधांची कमतरता जाणवतेय. येत्या काळात आरोग्य व्यवस्था पुन्हा वाढवतोय. जिथे जिथे आवश्यक तिथे व्यवस्था वाढवणार आहोत. आरोग्य व्यवस्था वाढवतोय पण हे एकतर्फी आहे. कारण आरोग्य व्यवस्था वाढले तरी डॉक्टर हवेत. जे नवे उत्तीर्ण झालेले डॉक्टर आहेत, त्यांना आवाहन करतोय, निवृत्त डॉक्टर, परिचारिकांना महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी व्हा.



