वणी येथील आनंदनगर,जिजाऊनगर वासियांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन
★ वणीतील एक आदर्श उपक्रम
★ माणसातील माणुसकी आली धावून………ना कोणत्याही पक्ष ,ना संघटनाच्या आधार घेत रक्तदानासाठी कोलोनीत बैठक.
★इच्छुक युवकवर्गानी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे असे आवाहन – वणीतील सामान्य नागरिक
वणी (12.एप्रिल ) :-महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये covid-19 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे.तरी आपणास एकत्र येऊन सामाजिक कर्तव्ये आपल्याला पार पाडायचे आहे.
त्याकरिता वणीतीलआनंदनगर ,जिजाऊ नगर वासियांच्या वतीने सर्व एकत्रित येऊन सामाजिक बांधीलकी जोपासत”रक्तदान हेच श्रेष्टदान” म्हणून संपूर्ण वणीकर जनतेला कळविण्यात येत आहे की ,सध्या कोरोना महामारीमुळे रक्ताची नितांत गरज जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर आनंदनगर ,जिजाऊ नगरच्या वतीने दिनांक 16. एप्रिल 2021 रोज शुक्रवारला हुनमान मंदिर आनंदनगर वणी येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांच्या सहयोगाने वेळ सकाळी
11ते 3 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी सर्व जनतेस विनंती आहे की ,या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहकार्य
करावे ही विनंती.भव्य रक्तदान शिबिर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांच्या सहकार्याने दिनांक.16 एप्रिल 2021 रोज शुक्रवार स्थळ: हनुमान मंदिर आनंदनगर वणी संपर्क:अभिजीत दरेकर ,प्रज्वल ठेंगणे , सोनल पारखी ,प्रवीण पिसे ,सौ.भावनताई गंगमवार,आकाश गज्जलवार देवेश राठोड ,कौस्तुभ गौरकार, सौ.रंजना झाडे दिनांक:-16.एप्रिल 2021 शुक्रवार ,वेळ: 10 ते 3
स्थळ:हनुमान मंदिर आनंदनगर वणी.




