वणी पोलीस स्टेशनच्या आवारात झाला २२ मोटर सायकलींचा लिलाव
वणी (27.मार्च ) :- पोलीस स्टेशन वणी येथे अनेक वर्षापासुन बेवारस असलेल्या २२ मोटर सायकलिंचा जाहिर लिलाव आज दिनांक २७ मार्च ला सकाळी ११ वाजता करण्यात आला. यावेळी २२ मोटर सायकलींच्या जाहीर लिलावातुन तब्बल १ लाख ९७ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोलीस स्टेशन वणी जिल्हा यवतमाळ येथे एकूण २२ बेवारस दुचाकी वाहने अनेक वर्षापासुन उभी होती, सदर वाहना बाबत कोनिही मालकी हक्क सिद्ध केलेला नव्हता,
त्यामुळे आज दि. २७ मार्च ला वणी पोलीस स्टेशनच्या आवारात २२ मोटर सायकलींचा जाहीर लिलाव करण्यात आला होता.
यावेळी वणी परिसरासह यवतमाळ येथुन एकुण ५२ लोक सहभागी झाले होते. हि लीलाव प्रक्रीया शासनाच्या नियमानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आला.
यावेळी प्रभारी तहसिलदार विवेक पांडे, ठाणेदार वैभव जाधव, सपोनि/ मायाताई चाटसे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.



