Vidarbh24News

Latest Online Breaking News

ग्रापंचायत पारडी येथे पाणी शुध्दीकरण सयंत्र( R.O/U.F plant) चे उद्धघाटन..

ग्रापंचायत पारडी येथे पाणी शुध्दीकरण सयंत्र( R.O/U.F plant) चे उद्धघाटन..

आता पारडी वाशियांना मिळणार मुबलक पाणी..

(दिनांक १७मार्च )- स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सन 2017/2018 अंतर्गत ग्रामपंचायत पारडी ला 10 लाख रु किमतीचे पुरस्कार मिळाला या पुरस्काराच्या अनुदानातून पाणी शुध्दीकरण संयंत्र चे बांधकाम करण्यात आले,
शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना अतर्गत पारडी येथील ग्रामपंचायतने स्वच्छता ,आरोग्य, रस्ते ,नाली आदी निकष पुर्ण करुन १० लाख रुपयांचा पुरस्कार मिळविला. या पुरस्काराच्या अनुदानातुन स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुध्दीकरण (R.O.)संयंत्र बसविले व त्याचे (दि.१६ रोजी)उद्यघाटन प. स. सावली चे माझी सभापती छाया ताई शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थित म्हणून प्रभारी सरपंच पारस भाऊ नागापुरे ,सदस्य केदार नागपुरे,बंडू मेश्राम, सारिखा भोयर, व ग्राम विकास अधिकारी संगोळकर रोजगार सेवक दिपक शेंडे,रोमा कुमरे,राकेश मडावी ,स्वप्नील फाले,अंकुश नरुले ,आदी उपस्थित होते.
शासनाच्या ग्रामविकास खात्यातुन वेगवेगळे पुरस्कार ग्रामपंचायतीसाठी दिले जातात, त्यात स्वच्छ ग्राम अभियान, स्मार्ट ग्राम पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार आदी योजनेचा लाभ घेऊन ग्रामपंचायती सुंदर बनविल्या जातात ,अशाप्रकारेच स्मार्ट ग्राम पुरस्कार २०१७-१८ अंतर्गत पारडी ग्रामपंचायतीला १० लाख रुपये पुरस्कार मिळाला व त्यातुन जल शुद्धीकरण संयंत्र बसविले यामुळे ग्रामवासियांना शुध्द (आर ओ) चे पाणी पिण्यास मिळणार असल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!