Vidarbh24News

Latest Online Breaking News

जुना वाघदरा येथे कोंबड बाज़ारावर वणी पोलिसांची धाड़ व दहा इसमांना केले अटक

वणी( 14 मार्च) :- जुना वाघदरा येथे कोंबड बाज़ारावर जुगारावर वणी पोलिसांनी धाड़ टाकून त्यात खेळणारे दहा इसमांना अटक करण्यात आली व 4,79,500 रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,आज दिनांक 14 .3 .2019 रोजी सकाळी खबर मिळाली की, ग्राम जुना वाघदरा तालुका वणी गावाचे पश्चिम दिशेला जनावरे उभे करणाऱ्या आखारावर काही इसम सार्वजनिक ठिकाणी कोंबडा या पक्षाची झुंजीवर पैशाची बाजी लावून हार जितचा कोंबडा बाजार नावाचा जुगाराचा खेळ खेळवित आहे.

असे खबरे वरून पोलीस स्टेशन वैभव जाधव यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टाफने रेड केला असता,त्या राजू पांडुरंग चव्हाण वय 30 ,संदीप नामदेव ईचवे वय 33 वर्ष ,शेख अश्पाक मोहम्मद रफी वय 36 वर्ष ,मनीष रामचंद्र वैद्य वय 42 वर्ष ,अमोल गोविंदा कळस्कर वय 28 वर्षे, महादेव कवडु उपरे 24 वर्ष ,विशाल संतोष बोकडे वय 19 ,मनोज रामचंद्र वैद्य वय 38, सुरज उध्वव खामनकर वय 29, मोहम्मद अली वय 22 सर्व रा. वणी वरील एक ते दहा आरोपी इसम जागेवर मिळून आले .

तसेच काही इसम आपले मोबाईल टाकून पळून गेले. घटनास्थळावरून पाच कोंबड़े पक्षी नगद किंमत दोन हजार रुपये ,दोन लोखंडी धारदार काती नगद किंमत 200 रुपये ,वेगवेगळ्या कंपनी व मॉडेलच्या मोटरसायकल सात एकूण किंमत तीन लाख वीस हजार रुपये, वर नमूद इसमांकडून एकूण नगदी 42,300 रू व एकूण 8 नग वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल 1 लाख 15 हजार रुपये असा 4 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील सर्वांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.संजय पुज्जलवार उपविभागीय अधिकारी वणी, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक वैभव जाधव ,संदीप एकाडे,संदीप एकाडे ,पो.उप.नी प्रताप बाजड, पो .उप.नि शिवाजी टिपूर्णे  तसेच डी.बी पथकाचे पोहवा/ सुदर्शन वानोडे पोना/ सुनील खंडागळे ,सुधीर पांडे , इमरान खान, सुनील केळकर ,पोकॉ/ पंकज उंबरकर, दीपक वान्द्रसकर,मिथुन राऊत यांनी केली. पुढील तपासणी स.पो.नि संदीप एकाडे करत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!