Vidarbh24News

Latest Online Breaking News

अहो साहेब !! राजुरचा रस्ता आहे की ….,.कचरा घर ?

वणी( 12 मार्च ):-  तालुक्यात राजुर कॉलनी हा गाव मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो येथे डब्ल्यू चे प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन दोन्ही प्रशासनाचे काम वाटून दिले आहे .दोन्ही काम व्यवस्थितरित्या करतांना दिसत नाही हे स्पष्ट दिसून येत आहे.डब्ल्यू .सी .एल ग्रामपंचायतला वारंवार कचराकुंडी साठी निवेदन देऊनही येथील प्रशासन सरळ दुर्लक्ष करीत आहे असा आरोप गावकरी करत आहे. गावात मोठ्या प्रमाणात नाले तुंबलेले,जागोजागी कचरा पडलेला आहे. परंतु येथील दोन्ही प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत दिसून येत आहे.डब्ल्यू सी एल ऑफिस पासून तर माता मंदिर व बुद्ध विहार पर्यंत फक्त आणि फक्त कचरयाचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यात वार्ड क्रमांक 2,3,4,5,व 6 च्या संपूर्ण वार्डमधे गलिच्छ जागो जागी पसरलेली आहे.

मागील तीन महिन्यांपासून सचिवाने कोणतेही कार्य स्वच्छतेचे केले नाही फक्त थातुर मातुर कार्य करून निघत असलेले चित्र या कचरयाने गावात दिसून येत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावात कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे .

नागरिकांचे आरोग्य आणखी धोक्यात निर्माण करण्याचे कार्य प्रशासन करीत आहे.याला प्रशासनाच्या हलगर्जीपणा म्हणायला काहीच हरकत नाही.आता प्रश्न निर्माण होतो की ,सचिवाची नेमके गावात कार्य काय? येणे आणि जाणे हेच कार्य उरलेले का ?

सरपंच पदग्रहण पर्यंत कोणतेही स्वच्छतेचे कार्य करणार नाही का ?अशी शपथ घेतली की क़ाय अशी चर्चा देखील गावात सुरु आहे.गावातील विहाराजवळ कचरा वारंवार होत असतो .परंतु तेथे अनेकदा गावकऱ्यांनी मागणी केली की ,काहीतरी उपाय योजना करावी .परंतु सचिव तिथे अनेकदा दुर्लक्ष करीत असताना दिसून आले आहे.

गावाच्या  स्वच्छतेसाठी वारंवार सचिवाला व wcl प्रशासनाला वारंवार सांगायची गरज  का पडत आहे  ? ,कळतच नाही .परंतु आता तरी सर्व प्रशासनाने एकत्र येऊन या कोरोनाचा काळामध्ये  गावातील स्वच्छता करावी  व तुंबलेली नाली स्वच्छ करावे. अशी गावकरी मागणी करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!