राजूर येथे सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी अभिवादन कार्यक्रम संपन्न
वणी( 10.मार्च ):- तालुक्यातील राजूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बहुजन स्टुडंट्स फेडरेशन, राजूर व महिला समारोप समिती,राजूर च्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम पार पडला.
भारतातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती व स्मृती दिनाचा कार्यक्रम राजूर गावात गेले 25 वर्षांपासून अखंडपणे विविध जनहितार्थ अभियान राबवून,गाव हितार्थ कार्यक्रम घेऊन साजरी केली जाते,या वर्षी राजूर गावातील सावित्रीबाई फुले चौकात स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळ कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूर ग्राम पंचायत चे नवनिर्वाचित सरपंच मा.विद्या पेरकावार प्रमुख उपस्थिती नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी बलकी, नवनिर्वाचित सदस्या वंदना देवतळे,दीपाली सातपुते, मंजुषा सिडाम, चेतना पाटील, पायल डवरे, विजय प्रजापती, तसेच नीता निमसटकर,रक्षा वानखडे,अंजली रामटेके,श्रुतिका धोटे हे उपस्थित होते,तर संचालन महेश लिपटे सर यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष मांडताना सरपंचा विद्या पेरकावार,“भारत देशाला विकासाच्या पथावर मुलींना चालण्यासाठी प्रेरणा देणारी सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे,आज सावित्रीबाई फुले मुळेच भारताची साक्षरता दुप्पटीने वाढ झालेली दिसत आहे,मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता तर,हे साक्षरता प्रमाण अर्ध्यावर आले असते.
यावेळी गावातील महिला वर्ग,विद्यार्थी वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन फेडरेशन व महिला समारोह समितीचे पदाधिकारी,सदस्य तसेच चौक परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले.



