Vidarbh24News

Latest Online Breaking News

आता पोलीस पाटलांनाही  353 चे सरंक्षण

मारेगाव( 6.मार्च ):- कर्तव्य बजावत असताना पोलीस पाटलाना मारहाण करण्यात येवुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या घटना घडत असताना मात्र पोलीस पाटलांच्या   तक्रारीची दखलपात्र गुन्ह्यामध्ये नोंद घेतली जात नव्हती याबाबत  पोलीस पाटिल संघटनां कडुन शासन दरबारी सततची  मागणी करण्यात आल्यामुळे पोलीस पाटलांनाही आता ईतर अधिकार्यां प्रमाणे  भा.दं.वी.कलम 353 अंतर्गत  सरंक्षण मीळणार आहे.

पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा प्रतीनिधी म्हणुन गावपातळीवर कार्यरत असतो गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्वाची जबाबदारी पोलिस पाटलावर असते मात्र अशा परीस्थितीत कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलावर मारहाण करण्यात येवुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात येत असल्याच्या घटना घडत असताना मात्र अशा घटनामध्ये पोलीस पाटलांनी केलेल्या तक्रारी वरुन सबधीता विरुद्ध 353 अन्वये गुन्हे दाखल करण्याची तरतुद  नव्हती. स्थानिक पातळीवर उद्भवलेल्या परीस्थितीत पोलीस पाटील असुरक्षित असताना राज्यातील पोलीस पाटलाच्या मागणीची गंभीर  दखल घेत  भा.दं.वी.कलम 353 या दखलपात्र  कायद्यान्वये सरंक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन अमलबजावणीसाठीच्या  अधिसुचनापत्र सबंधीत विभागाकडे पाठविण्यात आले आहे.यापूर्वी मानधन तत्वावर  काम करणाऱ्या पोलीस पाटीलाचे पद हे सरकारी नोकरीत बसत नसल्याने त्यांना कलम353 अंतर्गत सरंक्षण दिले जात नव्हते.त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्थे संबधीचा मुद्दा हाताळताना पोलीस पाटलांना मोठ मोठे आव्हान पेलावे लागत होते.  दोन गटातील संघर्षात पोलीस पाटलांचा जिव धोक्यात असताना अनेकदा एका गटाची बाजु घेतल्याच्या आरोपाखाली पोलीस पाटलांवर हल्ला करण्यात येत होता. त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रारी करण्यात येत होत्या त्यामुळे विनासरक्षणाने गावात काम करायचे कसे असा प्रश्न त्यांना सतत भेडसावत होता. त्यामुळे शासन प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलानी  मानधन वाढी सोबत ईतर कर्मचाऱ्यां प्रमाणे कामात अडथळा निर्माण करणाऱ्या पासुन सरंक्षण मीळावे अशी मागणी अनेक आंदोलनातुन केली होती त्यामुळे शासनाने या मागणीची दखल घेत कलम353 चे सरक्षण आता पोलीस पाटलांनाही बहाल केले असल्याने स्थानिक पातळीवरील  पोलीस पाटलामध्ये समाधान व्यक्त होत आहे.  

” 353 या दखलपात्र  कलमाने  पोलीस पाटलांना अभय मीळाले आहे.गावात शांतता व सुव्यवस्था राखणे सबंधीच्या महत्त्वाच्या कर्तव्यात गावचा पोलीस पाटील आता सुरक्षित झाला आहे. ग्रामीण भागात काम करताना आम्हाला मोठ मोठी आव्हान स्विकारावे लागते आमच्या सरक्षणार्थ घेतलेल्या शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो  “- सौ.माला तुळशिराम कुमरे,पोलीस पाटील (खैरगाव भेदी)

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!