Vidarbh24News

Latest Online Breaking News

*साथ फाऊंडेशन तर्फे दिव्यांगास वॉकर भेट*

*सावली*  समाजातील गरजू व दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घेत रोहित बोम्मावार, संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकारातून साथ फाउंडेशनतर्फे हिरापूर येथील . रामदास नंदू आत्राम यांना वॉकर भेट देण्यात आले,अस्थिव्यंगामुळे चालणे कठीण झालेल्या आत्राम यांच्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून, त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे.

साथ फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत असून, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करून संस्था समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे.रोहित बोम्मावार यांच्या पुढाकारामुळे या कार्याला विशेष गती मिळाली आहे.

यावेळी भाजपाचे दौलत भोपये, प्रकाश जवादे ,साथ फाउंडेशनचे संचालक आशिष गेडाम यांच्यासह ताराचंद खोब्रागडे प्रकाश वरगंटीवार , , संदीप कोरवते, प्रतीक वाकडे, आकाश बुरिवार, ईश्वर बट्टे, प्रथम रेगुंडवार, धनराज बट्टे, सोनू श्रीकोडावर, निलेश पुटकमवार, , राजू कोडापे, लोमेश गोहने, अजय राऊत, , मनोज मंडल, विलास खरवडे ,निरुडवार यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

उपक्रमामुळे हिरापूर परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, “गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!