Vidarbh24News

Latest Online Breaking News

कायर- बाबापुर जवळ मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसरले……

कायर (2.मार्च) :-वणी तालूक्यातील मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसरले .सविस्तर वृत्त असे की वणी येथून आदिलाबाद कोळसा वाहून नेणारी मालगाड़ीचे 12 डब्बे कायर- बाबापुर गावाजवळील फाट्याजवळ रुळा वरून खाली उतरले असल्याची घटना दिनांक 1 मार्च 21 ला सायंकाळच्या 6.30 दरम्यान घडली.वणी तालुक्यात हा कोळसा विद्युत व अन्य उद्योगा करिता वापरला जातो .त्यामुळे संपूर्ण भागात वणी रेल्वे सायडिंग वरून मालगाडीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतो.दि 1 मार्चला कोळसा भरलेली मालगाडी आदिलाबादच्या दिशेने साय 6 वाजताच्या सुमारास निघाली असता कायर गावाजवळील बाबापूर फाट्या जवळ मालगाडीचे काही डबे रेल्वे रुळावरून घसरले.

या घटनेमुळे परिसरात चांगलीच तारांबळ उडाली होती, दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती त्यातच, याची माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच नजीकचे अधिकारी वर्ग घटनास्थळी दाखल झाले होते.

ही घटना कशी झाली व याचे नेमके कारण अद्यापही गुलदसत्यात आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानि झाली नाही.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!