वणी उपविभागीय क्षेत्रात ठिकठिकाणी संत रविदास जयंती साजरी.
वणी/मारेगाव (27.फेब्रू ):- वणी व मारेगाव तालुक्यात राजूर कॉ,भालर (वसाहत),नेरड-पुरड,मारेगाव शहरात,तसेच सर्व शासकीय कार्यालयात शासकीय आदेशानुसार जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

राजूर येथील आरोग्य वर्धिनी केंद्र,ग्राम पंचायत कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला.भालर(वसाहत)येथे सरपंच,उपसरपंच तसेच चर्मकार बांधव व गावकऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले.
नेरड पुरड येथे चर्मकार बांधव तसेच गावकऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले.मारेगाव शहरात सुद्धा चर्मकार बांधव, नागरिकांतर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने भालर येथे सरपंच मंदा हेपट,उपसरपंच देवेंद्र पालखी, सुरेश टिकले,हनुमान वादेकर,पंकज वादेकर आदी
समाज बांधव व गावकरी, नेरड-पुरड येथे ज्योती येरेकर,अमोल डुबे,सुबोध बांगडे आदी समाज बांधव व गावकरी,मारेगाव येथे सोनटक्के,खोले आदी समाज बांधव व गावकरी उपस्थित होते.



