डाक कर्मचाऱ्यावर आर.डी पैशाची अफरातफर प्रकरणी गुन्हा दाखल
–आर. डी चे २९,८oo रुपयाची अफरातफर केल्याचा आरोप
मारेगाव( 26 फेब्रू ) :- तालुक्यातील बुरांडा ( खडकी ) येथील डाक कर्मचाऱ्यावर आर.डी पैशाची अफरातफर केल्या प्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बुरांडा ( खडकी ) येथील उपडाकघर मध्ये कार्यरत डाक कर्मचारी मुर्लीधर पैकाजी आत्राम वय ३२ यांनी आर डी ची रक्कम अफरातफर केली आहे
अशी तक्रार नागपुर च्या वैशाली नगरात राहणाऱ्या अखीलेश नगराळे या 35 वर्षीय फिर्यादीने मारेगाव पोलिसांत केली आहे.खातेदार कौश्यल्या जोगी,स्वाती हुसकुले, मंदा राजुरकर यांनी वेळोवेळी दिलेली रक्कम आर डी खात्यात जमा न करता अफरातफर केल्याचा
आरोप करण्यात आला असून, २९८oo रुपयाची अफरातफर झाल्याची नोंद तक्रारीतुन करण्यात आली आहे.
त्यामुळे सदर प्रकरणी 420/409नुसार गुन्हा कायम करण्यात आला असुन घटनेचा तपास पो.नि. जगदिश मंडलवार यांचे मार्गदर्शनात बिट जमादार चांदेकर करित आहेत.



