लग्न व-हाडी वाहन उलटले,पाच ठार सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार जवळील घटना
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ लग्नाचे व-हाड घेऊन जाणारा मिनीट्रक उलटून पाच व-हाड्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मृतात वाहनचालकासह 2 पु्रूष,2महिला आणि एका मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे.सुमारे 20 व-हाडी अपघातात जखमी झाले आहे.रत्नापूर येथून विवाह आटोपून एकारा येथे जात होते.दरम्यान हा भीषण अपघात घडला.स्थानिक नागरिक व मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करीत जखमींना सिंदेवाही रूग्णालयात दाखल केले.मृतकाची नावे अद्याप हाती आली नाही.



