अनिल राठोड यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड
मारेगाव (25.फेब्रू ):– संपूर्ण महाराष्ट्रात पसरत असलेल्या प्रेस संपादक व सेवा संघ च्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अनिल राठोड यांची पुन्हा एकदा नियुक्ती संघांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी .आंबेगावे यांनी केली आहे.पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेकडे पाहिले जाते.

पत्रकारावर कोठेही कोणताही अन्याय झाला तर त्या पत्रकाराच्या पाठीमागे संपूर्ण संघटना उभी राहते .हे या संघटनेचे वैशिष्ट्य आहे.
यवतमाळ जिल्ह्यात संघटना वाढीसाठी अनिल राठोड यांचे कार्य पाहून त्यांचीच पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.
” माझ्यावर संस्थापक अध्यक्षांनी जो विश्वास ठेऊन माझी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे अनिल राठोड यांनी विदर्भ 24 न्यूज वणीला सांगितले.
आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी संस्थापक डी.टी. आंबेगावे, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला,जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे व समस्त सदस्य, पदाधिकारी यांना दिले आहे.



