वनिता समाजातर्फे 62 हजार 151 रुपयांचा निधी मंदिरासाठी समर्पित
वनिता समाजातर्फे 62 हजार 151 रुपयांचा निधी मंदिरासाठी समर्पित
वणी:- येथील वनिता समाजाच्या वतीने अध्यक्षा भारती सरपटवार यांनी पुढाकार घेऊन वनिता समाजाच्या महिला सदस्या कडून भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिर निर्माणासाठी 62151/- हजारांचा समर्पण निधी गोळा केला. 
आज दि. 21 फेब्रुवारीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुका संघचालक हरिहर भागवत, अभियानाचे शहर प्रमुख अनिल आक्केवार, सहप्रमुख निलेश चचडा, किशन खुंगर, सुरेश धानोरकर यांना वनिता महिला समाजाच्या सदस्यांनी निधी अर्पण केला.
वनिता समाजातील महिलानी त्यांच्या सदस्यांकडून ऐच्छिक समर्पण निधी गोळा केला. या संस्थेच्या महिलांनी भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणासाठी 51 महिलांनी 62151 रुपयांचा निधी गोळा करून दिला. 
या प्रसंगी भारती सरपटवार, अंजली भट, अपर्णा देशपांडे, शरयू शुक्ल, मीना देशपांडे, वृषाली देशमुख, कामिनी हूड, माधव सरपटवार, गजानन कासावार उपस्थित होते.



