वणी शहरातील मुख्य चौकात ढोल ताशांच्या गर्जणेत शिवजयंती उत्साहात साजरी
वणी (19. फेब्रू ) :- शहरातील मुख्य टिळक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आज १९ फेब्रुवारी ला सकाळी ९ ते ११ वाजता सुमारास अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीभगवा ढोल ताशा व झांझ पथक यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संपुर्ण परिसर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या, घोषणेने गजरुन गेला होता. यावेळी या भगवा ढोल ताशा ध्वज आणी झांझ पथकामध्ये मोठ्या प्रमाणात युवक-युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग दर्शविला होता.

या पथकामध्ये ,२५ ढोल तर १० ताशे असा एकुण संच सहभागी झाला होता. आणी मोठ मोठ्या शिवाजी महाराजांच्या पताकांनी शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.



