पुन्हा यवतमाळ जिल्ह्यात आज रात्रीपासून कडक संचारबंदी आदेश जाहीर. शाळा, महाविद्यालय पुन्हा 10 दिवसासाठी बंद.
-वणीत मास्कसाठी पुन्हा प्रशासन कड़क धोरण लावणार का ?
-वणी प्रशासनाची कारवाई आणखी तीव्र होईल का?
वणी (18. फेब्रू ) – यवतमाळ जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. याचे कारण म्हणजे कोरोनाच्या वाढता प्रभाव जिल्ह्यात दिसून येत आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. आजच्या आदेशाने शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले . बाजारपेठा रात्री 8 वाजेपर्यंत असून शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभाला 50 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी 18 फेब्रुवारी रोजी रात्रि पासुनच जिल्ह्यात कडक संचारबंदी जाहीर केला आहे. शाळा, महाविद्यालय पुन्हा 10 दिवसासाठी बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता संचारबंदी लागू झाल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.महत्वपूर्ण बाब पाहणे गरजेचे असेल की,
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर 200 रुपयांचा दंड आकारण्याचेही निर्देश राज्यसरकारने दिले आहेत. टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर मर्यादित होता.
पण टाळेबंदी संपल्यानंतर गर्दीचे प्रमाण वाढले. असे असले तरी वणी येथे मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. तसेच वणी शहरात खेड़यातुन ये- जा करनारे लोकांची संख्या सुद्धा अगदी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे वणी प्रशासनाची कारवाई आणखी तीव्र होईल का? हे बघने अत्यंत महत्वाचे असेल .
कारण कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी मास्क वापरावा हा कारवाई मागील उद्देश असेल .ही कारवाई वणी तालुका प्रशासन कर्मचाऱ्याकडून पुन्हा सुरु होईल का ? पुन्हा अधिकारी यंत्रणा रस्त्यावर येईल का ? अशी चर्चा सुरु वणी शहरात सुरु आहे.



