आरक्षणाने सरपंच पदाचे स्वप्न भंगले “कही खुशी…कही गम” ची स्थिती
– गाव पुढारी व विरोधक झाले हतबल
– आताही आपली सत्ता बनविन्यासाठी फोडाफोडीचे गणित सुरूच का ?
-सरपंच निवडीची तारीख लांबणीने घोड़ेबाजार होण्याची शक्यता ?
वणी (13.फेब्रू ):- ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित झाले व आरक्षण निघाले या आरक्षनाने कही खुशी…कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .पूर्वी आरक्षण जाहीर झाले होते नंतर तो आदेश रद्द करीत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करू असे घोषित केले होते व शेवटी 4 फेब्रुवारी आरक्षण निश्चित झाले.

आता सरपंच कोण होणार ? हे आताही काही ठिकाणी गुलदस्त्यातच कारण काही पॅनलमध्ये आरक्षणात असणारे दोन किंवा तीन अशी सदस्यसंख्या असताना दिसून येत आहे.अशा परिस्थितीत कोण ? कुठे बंडखोरी करेल का अशी भीती सुद्धा काही पॅनल मध्ये दिसून येत आहे.

ते येणारी वेळच सांगेल.परंतु विरोधक व गाव पुढारी जुळवा-जुळवीचे गणिते करण्यासाठी बसले की काय हे बघणे गरजेचे आहे.काही ठिकाणी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना फोडाफोडीचे समीकरणे सुरू असल्याची चर्चा सुरु आहे.येत्या काळात असे चित्र दिसेल की काय हे बघणे अत्यंत महत्त्वाचे असेल.

मात्र गावात अशी चर्चा आहे की,सरपंच निवडीची तारीख लांबणीवर गेल्यामुळे घोडेबाजाराची शक्यता टाळणे कठीण होईल का ?जर सरपंच निवड लवकर झाली तर सर्व समस्या सूटेल ही अशी चर्चा गावगाड्यात आहे.




