भारतीय जनता पार्टी अनूसूचित-जमाती मोर्चा जिल्हा महामंत्रीपदी राजेंद्र सिडाम यांची निवड
वणी (10. फेब) :- भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा,अनूसूचित जमाती मोर्चा जिल्हा महामंत्री वणीचे राजेंद्र अजाबराव सिडाम यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,नितीन भूतडा यांचे शिफारशिनूसार तसेच आ.संजिवरेड्डी बोदकूरवार यांच्या मार्गदर्शनानूसार भाजपा अनू-जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक अ.कूलसंगे यांनी निवड केली आहे.
उपस्थितीत जिल्हाचे नेते दिनकराव पावडे,संजय पिंपळशेँडे जिल्हा उपाध्यक्ष तथा सभापती प.स.वणी,विजय पिदूरकर,संध्याताई अवताडे जिल्हा सरचिटणीस,श्रीकांत पोटदूखे भाजपा शहर अध्यक्ष तथा नगर परिषद उपाध्यक्ष,व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष लाल,राकेश बूग्गेवार शहर सरचिटणीस तथा नगर सेवक उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीमूळे भाजपा अनू-जमाती मोर्चाच्या कार्यकत्यामध्ये उत्साह संचारला असून राजेंद्र सिडाम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



