*चंद्रपूर येथे माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेची सभा संपन्न…

*चंद्रपूर येथे माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेची सभा संपन्न…
*विदर्भ व चंद्रपूर जिल्ह्य ची कार्यकारिणी घोषित…
*चंद्रपूर:- चंद्रपूर येथील हेड ऑफिस उत्तम नगर बंगाली कॅम्प, नेताजी चौक चुलबुले टाऊन राधिका सभागृह येथे आज दिनांक ०६/०२/२०२१ ला १ वाजता माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेची सभा आयोजित केली होती. त्या सभेचे मुख्य अतिथी तथा सत्कार मुर्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. तुळशीराम जी जांभूळकर साहेब. सभेचे अध्यक्ष अरुण दामोधर माधेशवार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख करण कोलगूरी, विदर्भ अध्यक्ष शिल्पा बनपुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी विदर्भ कार्यकारिणी ची घोषणा करण्यात आली.त्यामध्ये सौ. संगीता डाहुले-विदर्भ महिला उपाध्यक्ष,सौ.नेत्रा इंगुलवार-विदर्भ महिला संघटक, सौ. आरती आगलावे-विदर्भ महिला कार्याध्यक्ष,सौ.कौसर सईद खान-विदर्भ महिला सचिव,सौ. माया नरडे-विदर्भ महिला सहसचिव,सौ.संगीता कार्लेकर-विदर्भ महिला संपर्क प्रमुख.त्यासोबतच चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष-सौ.रेखा खैतल,जिल्हा उपाध्यक्ष-सौ.प्रीती साव,सौ.जमुना सुरजागडे,जिल्हा सचिव-सौ.प्रगती पडगेलवार, जिल्हा संघटक-जास्मीन शेख, कार्याध्यक्ष-सौ.वनीता चिलके,जिल्हा संपर्क प्रमुख-सौ.भाग्यश्री हांडे, जिल्हा महासचिव- सौ. र्किती पांडे, जिल्हा सहसचिव-सौ.मीना यादव, जिल्हा संपर्क प्रमुख-सौ.निता नागोसे, जिल्हा महिला मार्गदर्शिका-सौ.शारदा निरगुळवार, चंद्रपूर जिल्ह्य संघटक-श्री. टिकाराम पि. मशाखेत्री, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष-श्री.राहूल लेनगुरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष-सौ.सुषमा भुजबळ, चंद्रपूर तालुका अध्यक्ष – श्री. आशिष बोप्पनवार,श्री. प्रकाश कुंभरे-नागभिड तालुका अध्यक्ष, श्री.चंद्रशेखर चेल्लीरवार-नागभिड तालुका उपाध्यक्ष,श्री. राकेश घोटेकर-सावली तालुका अध्यक्ष, श्री. कृष्णा आंनदे -सिंदेवाही तालुका उपाध्यक्ष यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यावेळी सत्कार मुर्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. तुळशीराम जी जांभूळकर साहेब यांनी संघटनेबाबतचे ध्येय धोरणाबद्दल विस्तृत माहिती दिली व संघटना वाढीसाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न करावे. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या संघटनेचे नाव महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे. आणि अध्यक्षीय भाषणात अरुण दामोधर माधेशवार राज्य उपाध्यक्ष यांनी संघटनेमध्ये कामे करीत असताना अटी शर्ती चा व कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना एकमेकांशी संवाद साधुन एकोपा निर्माण करुन आपल्या पदाची जबाबदारी काय आहे. याचे भान ठेवून कामे करावी. कायद्याचा उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता बाळगावी असा मोलाचा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रगती पडगेलवार व आभार प्रदर्शन सौ. संगीता कार्लेकर यांनी केले.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. करण कोलगूरी, सौ. शिल्पा बनपुरकर, सौ. संगीता कार्लेकर व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन सर्व पदाधिकाऱ्यांना अल्पोपहार देऊन करण्यात आले.