वणी येथे देशव्यापी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन, अनेक आंदोलनकर्ते ताब्यात

-तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे या नाऱ्यांने गूँजले वणी शहर
वणी( 6. जाने ):-तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे व केंद्र सरकारने आंदोलकांची केलेली मुस्कटदाबी बंद करावी. या मागणीने आज वणी मध्ये वरोरा रेल्वे क्रॉसिंग वाय पॉईंट वर चक्का जाम आंदोलन करण्यात आले .गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून दिल्ली येथे सिमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने चर्चाच थांबविली आहे .याशिवाय त्या भागातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.म्हणून आज सर्वपक्षीय आंदोलन वणी येथे छेडन्यात आले.या आंदोलनात सर्व शेतकरी, सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारात उपस्थित होते.नंतर चक्का जाम स्थळी जाऊन आंदोलन सुरू करण्यात आले.
या चक्काजाम आंदोलनात टिकाराम कोगरे, पुरुषोत्तम आवारी,विश्वास नांदेकर, संजय देरकर,देवराव धांडे, अनिल घाटे,सुनील वरारकर, संतोष कुचनकार,आणिल हेपट,प्रवीण रोगे,विनायक काकडे,राजू तुरणकर, प्रवीण खानझोडे,अजिंक्य शेंडे, प्रमोद निकुरे, अजय धोबे, डॉ महेंद्र लोढा, मोरेश्वर पावडे,आशिष कुलसंगे, दिलीप भोयर, सुधीर थेरे,जयसिंग गोहोकार, प्रमोद वासेकर, संजय निखाडे,शंकर दानव, मनोज काळे, नागेश काकडे,मंगल तेलंग,गौतम जिवने,तेजराज बोडे,दिलीप काकडे,ललित लांजेवार,मंगल भोंगळे, जनार्दन थेटे,राजाभाऊ बिलोरीया,राजेश पहापले,अमोल टोंगे,
रवी देठे,शरद ठाकरे,रुद्रा कुचनकार,विक्रांत चचडा,रवी बोढेकर,देविदास काळे,ओम ठाकूर,दीपक कोकास,गणपत लेंडागे,प्रमोद मिलमिले,संदीप गोहोकार,सौरभ वानखेडे, सागर जाधव,हर्षद मुसळे,पियुष चव्हाण,चंद्रकांत दोडके अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी ठाणेदार वैभव जाधव व पोलीस प्रसासनाने चोख बंदोबस्त करून आंदोलकांना स्थानबद्ध करून अटक करण्यात येऊन सुटका करण्यात आली.
ह्या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बहुजन समाज पार्टी ,कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी व इतर सर्व सामाजिक संघटना सहभागी झाले होते.