“ग्रामपंचायत कवठी आणि नेहरू युवा केंद्र चंद्रपूर” यांच्या संयुक्त विद्यमाने विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे कार्यक्रम…

“ग्रामपंचायत कवठी आणि नेहरू युवा केंद्र चंद्रपूर” यांच्या संयुक्त विद्यमाने विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे कार्यक्रम…
कवठी प्रतिनिधी :- (दि. 6फेब्रुवारी ):- “ग्रामपंचायत कवठी आणि नेहरू युवा केंद्र चंद्रपूर” यांच्या संयुक्त विद्यमाने कवठी गावातील विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे कार्यक्रम हा कार्यक्रम घेण्यात आला. आणि विहिरींची स्वच्छता, विहिरीमधील पाण्याची स्वच्छता व काळजी, पाण्याचा योग्य वापर व विहीरी सभोवतालच्या जागेची स्वच्छता या विषयी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक श्री. मंगेश राजूरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत कवठी चे ग्रामविकास अधिकार श्री. सांगोळकर, ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर श्री. नितीन राजूरकर, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक श्री. मंगेश राजुरकर, सिंधूबाई कोटगले, रोहित कोसरे, युवराज राजुरकर, दुर्गा कोटगले, गायत्री राजूरकर, रूपाताई वळूले, सुधाकरजी कोसरे, ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच गावातील युवा, युवती उपस्थित होते.