कोलगांव कोळसा खाणीत शासन निर्णयानुसार ८०% कामगार हे स्थानिक असलेच पाहिजे- शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांचा कंपनीला इशारा –

– कोलगांव कोळसा खाणीत परिसरातील भुमीपुत्रांनाच रोजगार द्या
– अन्यथा शिवसेना स्टाइलने कंपनीला ऊत्तर देऊ..
वणी :- वणी उत्तर क्षेत्र व वणी एरीया परीक्षेत्रात अनेक कोळसा खाणी आहेत, वेकोलीच्या मामाध्यमातुन चालविण्यात येणाऱ्या कोळसा खाणीत विविध कामाचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आले आहे, त्याप्रमाणेच कोलगांव कोळसा खाणीतुन उत्खनन झालेल्या माती उचलण्याचे कंत्राट एच.आर.जी. या खाजगी कंपनीला देण्यात आले आहे.
वेकोलीच्या माध्यमातुन देण्यात आलेल्या कामाचे कंत्राटदार हे परप्रांतीय आहेत आणि ते सर्वाधीक कामगाराचा भरणा हे भुमीपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांचा करीत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. तरी शासन निर्णयान्वये ८०% कामगार हे स्थानिक असावे असा नियम असतांना भुमीपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांचा भरणा होत असेल तर शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी दिला आहे.
तरी सर्वप्रथम स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार द्यावा अन्यथा दि.११ फेब्रुवारी पासुन संबंधीत कंपनीचे काम बंद पाडू या प्रसंगी अराजकता, निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार संबंधीत कंपनी, वेकोली व प्रशासन असेल,यापूर्वी आपण अनेक निवेदन दिली आहेत परंतु आपण त्याला काही समाजकंटकाकडून दाबण्याचा प्रयत्न केला आहे .
यावेळी मात्र आपण ही बाब गंभीरपणे घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल असे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी दिले आहे.