कवठी येथे पोलिओ लसीकरण मोहीम…
कवठी येथे पोलिओ लसीकरण मोहीम…
कवठी प्रतिनिधी :- आज दिनांक 31/01/2021, रविवारला कवठी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान निमित्त व आरोग्य विभाग चंद्रपूर यांच्या वतीने 0 – 5 वर्षाखालील बालकांना कवठी गावातील बूथ क्र. 20 आणि बूथ क्र. 21 मध्ये सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले. आणि बालकांच्या आरोग्या विषयी माहिती देण्यात आली. या मोहिमेत गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कवठी बूथ क्र. 20 मध्ये 66 बालकांचे तर अंगणवाडी बूथ क्र. 21 मध्ये 55 बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कवठी चे नवनिर्वाचित सदस्य सौ. संगीता बापूजी पाल, श्री. राकेश चरणदास घोटेकर, सावली चे वैधकीय अधिकारी श्री. गोबाडे सर, आरोग्य सहाय्यक एस. एस ठिकरे, आरोग्य सेवक श्री. कांबळी सर, आरोग्य सेविका/ बूथ प्रमुख अधिकारी क्र. 20- जे. एस. मेंदळकर मॅडम, आरोग्य सेविका/ बूथ प्रमुख अधिकारी क्र. 21- एस. टि. गदेकार मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी- प्रीती वनकर, बूथ सदस्य – संगीता गेडाम, अंगणवाडी कार्यकर्ते सौ. शशिकला राऊत मॅडम, मदतनीस – सिंधुताई बोबाटे मॅडम. नेहरू युवा केंद्र तालुका प्रतिनिधी- श्री. मंगेश राजूरकर, मा. गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष ग्रामपंचायत कवठी – टिकाराम पि. म्हशाखेत्री, करणं चिताडे. उपस्थित होते.



