राजुर येथे सरपंच पदाचे आरक्षण सोडत होण्याअगोदरच राजकीय घोड़ेबाजार (उमेदवार फोड़ा- फोडीची) नीति सुरु झाली का ?
– परिस्थितित घोड़ेबाजारात सेटिंग होत असेल तर गावात निवडणुकीच कशाला ?
– नवख्या उमेदवारांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी मते मागितली की ,गावाचा विकास करण्यासाठी मते मागितली .याचे चित्र अवघ्या काही दिवसातच दिसून येईल.
वणी ( 31 .जाने ) :- तालुक्यातील राजूर येथील ग्रामपंचायतीचा निवडणूक निकालाने तर्क -वितर्क लावण्यात येत .कोण सरपंच होणार हे आताही ठाऊक नाही. येत्या 2 तारखेला आरक्षण जाहीर होणार आहे . घोडेबाजार होण्याची शक्यता टाळता येणे आता कठीण झालेले आहे .मागील पंचवार्षिक निवडणुकीत अशाच प्रकारे स्थिती निर्माण झाली होती यंदाही अशाप्रकारे होईल की काय ? अशी चर्चा गावात आहे. 
बहुमत परिवर्तन पैनलला असूनही असे घोडेबाजार करायचे असेल तर मतदानच कशाला ? सामान्य नागरिकाच्या मताला धोका देण्यासारखेच ! कारण, मतदार हा आपले अमुल्य मत विकास करण्यासाठी देत असतात. सरतेशेवटी उमेदवाराला घोडेबाजाररात लपंडाव करून विकत घेत असेल तर काय गरज मतदान प्रक्रिया करण्याची असा सवाल नागरिक करत आहे. 
22 डिसेंबर 2019 ला ग्रामपंचायत मतमोजणी झाली त्यात नव्या चेहऱ्यांना निवडून आणण्यासाठी मतदारांनी राजुर गावात चांगलाच प्रतिसाद दिला अनेक दिग्गजांची छाप पडू दिले नाही व सत्ताधारी जनता पक्षाला फक्त सहा उमेदवारावर समाधान मानावे लागले दुसरीकडे गावाचा विकास करण्यासाठी एकत्र आलेले अनेक मताचे लोक परिवर्तन पैनलला बनविले त्यात त्यांना 17 पैकी 11 उमेदवार म्हणजेच येथील बहुमत सुद्धा प्राप्त करून दिले.पहिल्यांदाच राजूर गावात सत्ताधिकारविरुद्ध परिवर्तन पैनलला भरघोस मतानी निवडून करुन दिले.

महत्वाचे म्हणजे जनता पैनलला वार्ड नं 1,2,3 व 5 मधून एकही उमेदवारांना पसंती दिली नाही व सरते शेवटी वार्ड क्र 4 व 6 जो वेकोलिचा अन्तर्गत( अतिक्रमण भागात ) येणारे वार्डमधेच निवडून आले.आता सहज सांगणे असे की,राजुर येथील जनतेला सत्ताधारी पक्षाचे एकही उमेदवार नकोसे झाले ही स्थिति निवडून आलेले परिवर्तन पैनलचा उमेदवारांनी समजून घेणे आवश्यक आहे.अश्या परिस्थितित घोड़ेबाजारात सेटिंग होत असेल तर गावात निवडणुकीच कशाला ?
परिवर्तन पॅनलचे 17 उमेदवार एकत्रित लडले ,एकत्रित विचार केला व एकत्रित आश्वासन दिले त्यावर भरवसा करीत मतदारांनी त्यांना अधिक मते दिले व जनता पाण्याला फक्त सहा उमेदवारांवर खुश रहावे लागले. राजूर येथील ग्रामपंचायतीत 9 च्या आकड़ा बहुमत असेल म्हणून आता हे बघणे महत्त्वाचे कोण फोडाफोडीचे राजकारण करणार ? परिवर्तन पॅनेलने विकास करण्यासाठी एकत्रित निवडणूक लढविली बहुमत प्राप्त केले व त्यातही घोडेबाजार होत असेल तर उमेदवारांना का निवडून द्यावे ? व कोणावर भरवशा ठेवावे?
ष्ट चर्चा गावात होताना दिसत आहे.गावात अशा चर्चांना ऊत येत आहे की, आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तन,मन आणि महत्वाचे म्हणजे धन कामाला लावेल पण सरपंच आपलाच नक्की होईल !
अशी आशा काही गाव कारभारी व पुढारी घेऊन बसून आहे.आता राजुर गावात हे बघणे महत्त्वाचे आहे की आता ही गावात लोकशाही जिंकेल की ,एकाधिकारशाही ही सर्वस्वी जबाबदारी आता नवखे उमेदवारांवर येऊन ठेपलेली आहे.नवख्या उमेदवारांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी मते मागितली की ,गावाचा विकास करण्यासाठी मते मागितली ! याचे चित्र अवघ्या काही दिवसातच दिसून येईल .



