“चला वणी नगर पालिकेवर भगवा फड़कवूया “… वणी येथे “शिवसंपर्क अभियानाला “१ फेब्रुवारी पासून प्रारंभ
– समस्त शिवसैनिकांना तसेच सर्व पदाधिकाऱ्याना सामील होण्याचे आव्हान राजू तुराणकार यांनी केले
– शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा !
वणी (31.जाने ):- वणी नगर पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीची तयारी साठी वणी शहर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण वणी शहरात शिवसैनिक नोंदणीचा व “आम्ही शिवसेनेचे मतदार” घर तिथे शिवसैनिक नोंदणीचे उद्दिष्ष्टये डोळ्या समोर ठेवून संपूर्ण तसेच एकात्मतेची भावना जोपासत ,संस्कृतिचा मान ठेऊन शिवसैनिकांनी सहभाग घेऊन सदरचे कार्य तडीस न्यायचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी व मराठी हॄदयसम्राट मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा !
ही विनंती सर्व शिवसैनिक ,शिवसेना युवासेना,महिला आघाडी, कामगार सेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पद मोहीमेत सहभागी होऊन यशस्वी करावी असे वणी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकार यांनी केली आहे. तसेच”शिवसंपर्क अभियान “१ फेब्रु. रोज सोमवार पासून सुरू होत आहे.
तरी शिवसेना जिल्हा प्रमुख,सर्व आजी -माजी शिवसेना नेते , युवा सेना, महिला आघाडी, कामगार सेना, पदाधिकारी व विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व पदाधिकारी,उप- तालुका प्रमुख,उप – तालुका

संघटक,विभाग प्रमुख,गट प्रमुख,गट संघटक,गण प्रमुख,गट संघटक,सर्व शाखा प्रमुख ,शिवसैनिक व सर्व कट्टर कार्यकर्तेनी या “शिवसंपर्क अभियानात” भाग घ्यावे,असे आव्हान वणी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकार यांनी समस्त शिवसैनिकांना,मतदारांना व कट्टर कार्यकर्त्यांना केले आहे.




