एका मॅक्सीमो गाडीसह 4 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
▪️वणी पोलिसांची दारू तस्करांवर मोठी कारवाई
वणी: शुक्रवार 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वरोरा बायपासवर एक मॅक्सीमो गाडी पकडण्यात आली. ज्यामध्ये 31 पेट्या देशी दारू आढळून आली आहे. या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांना माहिती मिळाली की सायंकाळी मारेगावकडून वरोरा येथे दारूची तस्करी होणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. शहरातील नांदेपेरा चौफुली जवळ शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गाडी येतांना दिसली.
पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 31 पेट्या देशी दारू आढळून आली. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक मॅक्सीमो गाडी क्रमांक MH-29- T- 5667 जप्त करण्यात आली आहे.सदर दारू ही 80 हजार 184 रुपयांची असून गाडीची किंमत 4 लाख असा एकूण 4 लाख 80 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


यातील आरोपी रूपेश शंकर आत्राम रा. गोकुलनगर व अक्षय महादेव आवारी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 65 (अ),(इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुदर्शन वानोळे करीत आहे.


सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोऊनी गोपाल जाधव , सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, यांनी केली.



