वणी तहसिल कार्यालयात २ फेब्रुवारीला सरपंच पदाचे आरक्षण सोडत- ८२ ग्रां.पं. व उर्वरित मुदत संपलेल्या १९ ग्रामपंचायतींचे आरक्षण असे एकूण १०१ ग्रामपंचायतीत सरपंचाचे ठरणार भाग्य
– महीला सरपंच पदाचे आरक्षण दिनांक-४ फेब्रुवारी २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयात सकाळी ११:३० वाजता काढण्यात येणार .
वणी :- वणी तालुक्यातील अनुसुचित क्षेत्राबाहेरील खालील नमुद ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने तहसिल कार्यालय वणी येथे दिनांक-२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता काढण्यात येणार आहे.आरक्षण काढल्यानंतर महीला सरपंच पदाचे आरक्षण दिनांक-४ फेब्रुवारी २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयात सकाळी ११:३० वाजता काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीला नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक अधिकारी वणी यांनी केले आहे. 

(१) कळमना खुर्द (२) कुंड्रा (३) डोली (४) शेवाळा (५) वडजापूर (६) सोनेगांव चिखली (८) कुंभारखनी (९) मोहदा (१०) कुली (११) विरकुंड (१२) मोहोली (१३) सुकनेगांव (१४) वडगांव टिप (१५) चिलई (१६) महाकालपूर (१७) भुरकी ( १८) पेटूर (१९) गोवारी पार्डी (२०) परसोडा (२१) पिंपरी (का) (२२) मेंढोली (२३) चनाखा (२४) निंबाळा रोड (२५) साखरा दरा (२६) वांजरी (२७) रासा (२८) कोणा (२९) शिंदोला (३०) वागदरा

(३१) टाकळी (३२) भांदेवाडा (३३) ढाकोरी बोरी (३४) वरझडी (३५) येनक (३६) वेळाबाई (३७) शिरपूर (३८) नेरड (पुरड) (३९) पठारपूर (४०) नवरगांव (४१) कायर (४२) कवडसी (४३) कुरई (४४) नांदेपेरा (४५) पिंपळगाव (४६) खांदला (४७) उमरी (४८) मारेगांव (को) ४९) पळसोणी (५०) मुर्धोनी

(५१) चारगांव (५२) परमडोह (५३) चिंचोली (५४) घोन्सा (५५) सावंगी (५६) बोर्डा (५७) बोरगांव (में) (५८) झोला (५९) चिखलगांव (६०) कोलेरा (६१) बेलोरा (६२) मुंगोली (६३) गणेशूपर (६४) राजुर (कॉ)

(६५) बाबापूर (६६) कळमना बु. (६७) बोरी (६८) ब्राम्हणी (६९) गोवारी (कोणा) (७०) निलजई (७१) कृष्णाणपूर (७२) पुरड (ने) (७३) नायगांव बु. (७४) लालगुडा (७५) नायगांव खु. (७६) वारगांव (७७) कोलगांव (७८) भालर (७९) निंबाळा (८०) तरोडा (८१) रांगणा (८२) मंदर (८३) शिवणी जहा (८४) बु. दहेगांव (घो. ) (८५) पुनवट
(८६) सावा (८७) माथोली (८८) निळापूर (८९) शेलु खु. (९०) अहेरी (९१) साखरा (को) (९२) तेजापूर (९३) शेलु बु. (९४) माणकी (९५) मजरा (९६) पुरड (पु) (९७) निवली (९८) केसुल्ली (९९) बेसा (१००) लाठी (१०१) उकणी असे आहे.




