तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे -ॲड.रुपेश ठाकरे
वणी – तालुक्यातील मुंगोली गावचे युवा मा.सरपंच ॲड.रुपेश ठाकरे हे तालुक्यातील नवयुवकासाठी मोठ्या प्रमाणात प्रेरणादायी ठरत आहे. राजकारण म्हणजे गढुळ पाणी, असे समजणारे युवकांसाठी मुंगोली गावचे माजी युवा उच्चशिक्षित सरपंच ॲड.रुपेश ठाकरे हे अपवाद ठरत आहे. मागील पंचवार्षिक मध्ये तिन पॅनल मधुन ,पाच सदस्य निवडुन आणुन मुंगोली गावाची धुरा सांभाळून, मागील 15-20 वर्षा पासून प्रलंबित असलेला मुंगोली गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला.

तसेच मागील पाच वर्षात नवनविन योजना तसेच वेगवेगळे उपक्रम स्वतःचा पुढाकाराने राबविले. याच कामाची पावती म्हणून यंदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ,संपुर्ण मुंगोली गाव बिनविरोध झाले.
त्यामुळे संपुर्ण तालुक्यातील युवा पिढिने ॲड.रुपेश ठाकरे यांच्या कडुन शिकण्याजोगे नक्कीच आहे . असे सर्व स्तरावरुन बोलले जात आहे.




