गोडगाव ( ईजासन ) येथे माँ भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कायर :- वणी तालुक्यातील कायर येथील जवळच असलेल्या गोडगाव( ईजासन )येथील भवानी माता मंदिरात पौष महीना सुरू असताना भाविक येणे सुरू झालेले आहेत.पौष महीनेला प्रारंभ होताच भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत असते. हे मंदिर प्राचीन काळातील असून या मंदिराच्या सभोवताली घनदाट जंगल परिसर आहे.
हा संपूर्ण परिसर वनश्रीने नटलेला असून हे मंदिर टेकडावर वसलेले आहे.या दरम्यान जेवणावळी उठतात तसेच मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करतात.
या मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.