जि.प. उच्च प्राथमिक शाळा,कायर येथे प्रजासत्ताक दिन साजरा

वणी :- 26 जाने.2021 रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळा,कायर येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज झोडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संविधानानाचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून ध्वजारोहण केले संविधान उद्देशिकेचे वाचन कुमुदिनी देवतळे पदवीधर शिक्षिका यांनी केले.
मुख्याध्यापक शेकन्ना भिंगेवार यांनी प्रास्ताविक भाषण केले,कवडू जीवने पदवीधर शिक्षक यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले.
या प्रसंगी तंबाखू मुक्तीसाठी शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन गजानन तुरारे यांनी तर आभार रंजना तुपे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योत्स्ना मानकर, लहु आत्राम,कीर्ती गंजीवाले, विणा अरोडा यांनी प्रयत्न केले.