जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धोपटाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न
वणी :- तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, धोपटाळा येथे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलभाऊ जुमनाके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बबनराव देठे (पोलिस पाटील), मारोती भाऊ बोढाले (ग्रा.प.सदस्य),अनिलभाऊ बोढाले (प्रतिष्ठित नागरिक), पांडुरंगजी मातीरे, कवडुजी मडावी(ज्येष्ठ नागरिक), हरडे सर (मु. अ.) हे उपस्थित होते. भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन घेण्यात आले तसेच तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आले . सूत्र संचालन येथील सहाय्यक शिक्षक प्रकाश तालावार यांनी केले.





