*टोक (गंगापूर) येथील वैयक्तिक शौचालय बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार*
*नवनियुक्त ग्रा.पं. सदस्य वैभव पिंपळशेंडे यांच्या सतर्कतेमुळे प्रकरण आले उघडकीस*
पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना ग्रामपंचायत हद्दीतील टोक (गंगापूर) येथे वैयक्तिक शौचालय बांधकामात कंत्राटदाराने काम पूर्ण न करता लाभार्थांकडून बिलाची रक्कम वसूल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मागील वर्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत टोक (गंगापूर) येथे संबंधित कंत्राटदाराने वैयक्तिक शौचालयाचे काम हाती घेतले, मात्र काम अर्धवट करून अशिक्षित असलेल्या लाभार्थ्यांकडून बिलाची रक्कम वसूल करून खुप मोठा गैरव्यवहार केला आहे. या घटनेमुळे गावकर्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे यांना मिळताच त्यांनी तातडीने टोक येथे जाऊन घटनेची पाहणी केली.
सदर घटना खुप निंदनीय असून या गैरव्यवहारातील संबंधित कंत्राटदाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
जो पर्यंत गावकर्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मि स्वस्त बसणार नाही अशी प्रतिक्रिया वैभव पिंपळशेंडे यांनी विदर्भ २४ न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.



