मॅकरूँन स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई ,वणी शाळेत महान स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व मराठी हॄदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
वणी :- मॅकरूँन स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई वणी या शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस व मराठी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभना यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले .
शनिवार दि.23 रोजी मॅक्रुन शाळेत झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती शोभना व शाळेचे सर्व शिक्षक वृंद ,शाळेचे वरिष्ठ लेखापाल माया तराळे ,माया गिरी व कर्मचारीवर्ग यांची महत्त्वाची उपस्थिती होती.


तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी कुरील यांनी केले.सरतेशेवटी महान स्वातंत्र्य सेनानी ,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी काढलेले उदगार ” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा ” या नाऱ्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.



