रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी बजरंग दलाचे करण कोलुगुरी यांची निवड…

*रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी बजरंग दलाचे करण कोलुगुरी यांची निवड….
चंद्रपूर दि (प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष पदी करण राजय्या कोलुगुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली.
विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या बैठकीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी युवजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती दिली.
युवाध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जापैकी करण यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात येऊन पक्षाध्यक्षा नंदाताई कांबळे यांच्या आदेशाने ही निवड सर्वनुमाते करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाला बळकटी देऊन लोकशाही प्रबळ करून पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांचे हात मजबूत करण्याच्या हेतूने युवाध्यक्ष पदाची जवाबदारी स्वीकारली असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष करणं कोलुगुरी यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
करणं कोलुगुरी यापूर्वी बजरंग दलाचे काम करीत असत हिंदुत्वावर त्यांचे प्रभुत्व होते, मात्र रिपाई डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ राजन माकणीकर यांनि त्यांचे मन वळवून पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
सध्या माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून बजरंग दलाला त्यांनी कायमची सोडचित्तीं देऊन तन मन धनाने रिपाई डेमोक्रॅटिक च्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ चालवणार असल्याचा संकल्प ही करण यांनी बोलून दाखवला.