वणी येथील प्रतिष्ठित व्यापारी कांतीलाल जोबनपुत्रा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन….
वणी:- येथील प्रतिष्ठित व्यापारी विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ सक्रिय कार्यकर्ते कांतीलाल जोबनपुत्रा वय 87 यांचे नागपूर येथील वोकार्ट दवाखान्यात निधन झाले.
त्यांच्या मागे 3 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर काल कोरोनातून मुक्त झाल्याचा अहवाल आला होता.
परंतु काल रात्री त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राण ज्योत रात्री 9 वाजता मालवली. त्यांच्यावर नागपूर येथे आज दि. 17 ला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.



