Vidarbh24News

Latest Online Breaking News

श्रीराम मंदिर निर्माण निधी साठी मोटरसायकल रॅलीने जनजागृती

वणी:- आयोध्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भगवान श्रीरामाचे भव्य मंदिराचे निर्माण कार्य चालू झाले आहे. या भव्य मंदिरासाठी देशातील प्रत्येक व्यक्तींचा सहभाग असावा यासाठी चालू असलेल्या निधी संकलनाच्या जनजागृतीसाठी येथील रंगनाथ स्वामी मंदिरापासून वणी शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. वणी येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण
व गृहसंपर्क अभियाना अंतर्गत काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीला तालुका संघचालक हरिहर भागवत, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी झेंडी दाखवून रितसर सुरुवात करून दिली. या प्रसंगी जिल्हा सहकार्यवाह व जिल्हा अभियान सहप्रमुख प्रशांत भालेराव, पंचायत समिती वणीचे सभापती व अभियान समितीचे जिल्हा सदस्य संजय पिपळशेंडे, रवी बेलूरकर, गजानन कासावार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशाल काळे, अनिल आक्केवार प्रामुख्याने उपस्थित होते.
वणी शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान श्रीरामाच्या घोषणा देत पूर्ण वणी शहर रॅली मुळे या दरम्यान निनादत होते. ही रॅली रंगनाथ स्वामी मंदिरातून निघून जगन्नाथ महाराज मंदिरात पोहचून तिथे आरती करण्यात आली. तिथून या रॅलीचा श्रीराम मंदिर समर्पण निधी कार्यालयात येऊन समारोप करण्यात आला.

या प्रसंगी भगवान श्रीरामाच्या मंदिर निर्माणाविषयी माहिती देण्यात आली. याकरिता नगर सहकार्यवाह तथा अभियान समितीचे युवाप्रमुख प्रसन्ना संदलवार, विवेक पांडे, विशाल झाडे, कृष्णा पुरवार, सुभाष इंगोले, प्रज्योत रामगिरवार, संकेत आक्केवार, केतन लाभे, प्रतीक पेटकर, विद्यार्थी परिषदेचे श्रीवर्धन लोथे यांनी विषेश परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!