राजुर – वणी परिसरातील हाँटेल्स व ढ़ाबे हाउसफुल्ल……….… ढ़ाबे पे चर्चा सुरु..
▪️ ग्रामपंचायत निवडणुकीची औचित्य साधुन ढ़ाबे व होटेल्स होऊ लागले हाऊसफुल…….
▪️ तरुण पिढीसमोर आदर्श काय…? जेष्ठ नागरिकांच्या मनात भिती.
◼️ कार्यकर्त्याना सांभाळुन उमेदवार करताहेत ढ़ाबे पे चर्चा……..
वणी ( 9 .जाने ):- वणी तालुक्यातील ग्रामपंचायतच्या होवु घातलेल्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असुन चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. कोणतीही निवडणुक म्हटले की दारु पिणारे ,मटन खाणारे यांच्यासाठी जणु सणासारखे दिवस म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यात उमेदवाराची तर निवडणुक होईपर्यत दमछाक होत असते विशेष सांगायचे म्हटले तर, काहींना तर निवडणुकीशी काही देणंघेणं नसतं परंतु आर्थिक फायदा कसा होईल, कसा करुन घेता येईल यासाठी त्याची धावपळ सुरु असते. दिवसा एका पँनल कडुन सोबत फिरताना तर रात्री दुस-या पँनलकडुन सोबत फिरत असतानाचे चित्र पहावयास मिळणार आहे .
यामध्ये कार्यकर्त्याना सांभाळुन ठेवायचे असेल तर उमेदवारांना लाखो रुपयांचा खर्च करणे गरजेचे असते. एकंदरीत निवडणुक म्हटले की हौसे नवसै यांच्यामुळे निवडणुकीत खरा रंग भरला जातो यामुळेच परिसरातील हाँटेल्स,धाबे ,याठिकाणी खाणा-या पिणा-याची संख्या वाढलेली पहावयास मिळत असुन धाबे हाऊसफुल झाल्याचे चित्र वणी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागालगत पहावयास मिळत आहे .
त्यामुळे हाऊसफुल झालेल्या धाब्यावरील वाढत्या आंबटशौकीनांची वाढती संख्या बघुन आपल्या घरातील सुशिक्षीत तरुण उमेदवार देण्यासाठी कुंटुब प्रमुख माघार घेतात असे चित्र या निमीत्ताने निर्माण झालेले आहे

याचे कारण म्हणजे आपल्या मुलानांही भविष्यामध्ये अशाच प्रकारची सवय लागेल ,त्यामुळे या दारुच्या पार्ट्या अगोदर बंद झाल्या पाहीजे तर गावाचा विकास होणे शक्य होईल अशा प्रतिक्रिया बोलताना काही गावातील जेष्ठ नागरिकांनी बोलतांना दिल्या आहेत.



