जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट तात्काळ करून आवश्यक सुविधा पुरविण्यात यावे *उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांची मागणी*
जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट तात्काळ करून आवश्यक सुविधा पुरविण्यात यावे
*उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांची मागणी*
सत्यशोधक न्यूज 24/ भंडारा: येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये आग लागल्याने दहा कोवळ्या निष्पाप जीवांचा जीव या आगीत होरपळून गेला. ही घटना अतिशय दुर्दैवी व निंदनीय आहे. सदर रूग्णालयाचे फायर ऑडिट झालेले नसल्याने व आरोग्य विभागाच्या गाफीलपणामुळे या निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे या कोवळ्या जीवांच्या कुटुंबांना किती यातना होत असतील हे पिडीत कुटुंबालाच माहित असेल. सदर घटना ही अतिशय दुःखदायक असून अशा प्रकारची घटना आपल्या जिल्ह्यात कोणत्याही शासकीय व खाजगी रुग्णालयात घडू नये करिता तात्काळ सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट करून जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात याव्या अशी मागणी प्रसारमाध्यमांद्वारे राजू झोडे यांनी जिल्हा प्रशासन व शासनाकडे केली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय व प्रशासकीय स्तरावरून तात्काळ वरील मागणीची पूर्तता करावी अन्यथा वरील मागणीसाठी उलगुलान संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा संबंधित शासन व प्रशासनाला देण्यात येत आहे.



