राजुर येथे उमेदवारांसाठी स्टार प्रचारक उतरले मैदानात ◼️” किसमे कितना है दम….मगर राजुर गाँव में आज भी विकास कम !
▪️रस्ते ,नाली ,पाणी ,दिवे व घरकुल लाभार्थी 5 वर्षापासून प्रतिक्षेत तरीही वोट दो ….वोट चे नारे चालूच….
वणी ( 6.जाने.) :- सध्या राजुर ग्रामपंचायतीचा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे . प्रत्येक उमेदवार आपण निवडून येणारच त्या खात्रीने तो कामाला लागलेला आहे.गावातील आजी – माजी पुढारी मंडळी या निवडणुकीत स्टार प्रचारकांची भूमिका करताना दिसत आहे आणि आजी – माजी सरपंच गट सुद्धा मी पुन्हा येईल ..मि पुन्हा येईल ! या आशेने प्रचार करतांना गावात चर्चा आहे .आता राजुर गावात सर्व उमेदवारांसमोर एकच समस्या उभी आहे की, ते म्हणजे विकास कसा करता येईल ! ज्या गावचा कारभार सुरळीत चालूं व गाव पातळीवर विकास करून द्यायचा हा ग्रामपंचायत मुख्य उद्देश असतो. परंतु राजुर ग्रामपंचायत ही अनेक समस्यांनी ग्रासलेल्या आहे.
म्हणजेच विकासापासून कोसो दूर असल्याची चर्चा आहे. ही ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. तसेच १७ सदस्य आहे आणि गावात एकूण मतदार 11,000 आहे.
जवळपास गावात 51 उमेदवार उभे आहेत. नाम बड़े दर्शन छोटे ची परिस्थिती आज राजुर गावाची आहे . सर्व उमेदवारांसमोर विकास करण्याचे आव्हान आहे.रस्ते ,नाली, पाणी, घरकुल व अन्य कामे या 5 वर्षात कुठेही दिसून आलेले नाही .
याचा अर्थ राजुर येथील एवढी मोठी ग्रामपंचायतीला विकासकामा साठी येणारा निधी जाते कुठं ? मग कोणत्या कार्यासाठी लावतात ?विकास फक्त कागदावरच का?अशी चर्चा सुद्धा प्रचार करतांना मतदार राजा उमेदवारांना विचारत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत दर पंचवार्षिकेप्रमाणे यावर्षीही ‘ वोट दो … वोट दो ‘चे नारे गावात सुरु झाले. अहो ! उमेदवारांनो विकासासाठी मते मागता की,फक्त सरपंच बनन्याचा स्वप्नपूर्तीसाठी ? गावकरी सवाल करीत आहे.महत्वाचे आजही राजुर गावात मुख्य बाजारपेठ नाही.राजुर येथील काही भाग wcl अंतर्गत येणारे वार्ड आजही विकासकामापासून दुरच आहे .
तरीही उमेदवार इथे येऊन मते मागत आहे क़ाय अशा उमेदवारांना निवडून देणार क़ाय ? आज रोजी राजुर गावात विकास खूंटलेला आहे.त्याला कारण कोण ? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे मतदार यंदाच्या निवडणुकीत देणार ! येणारा काळ उमेदवारांना सोप की कठिन हे सामोर आपणास दिसनारच !



