वासरावर केला बिबट्याने हल्ला
वासरावर केला बिबट्याने हल्ला
प्रतिनिधी/ गडचिरोली: तालुक्यातील मौजा शिवणी येथे गोठ्यात बांधलेल्या वासरावर दि ७जाणे, ०६:३० वाजता श्रीराम जुमनाके यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. या बिबटयाच्या हल्ल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . तरी वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. या पूर्वी तालुक्यात दोन महिलांना बिबटयाने ठार केले असून अनेक जनावरांना ठार केले आहे.
तत्काळ माहिती होताच वन कर्मचारी लगेच मोकास्थळी पाहणी करून लोकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आले.



