वणी शहरात ओबीसीच्या विशाल मोर्चा…..सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सहभाग
वणी (3 जाने ) :- वणी शहरात ओबीसी च्या वतीने दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त केंद्रसरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र काँलममध्ये करण्यासाठी वणी तहसील कार्यालवर विशाल मोर्चा काढण्यात आले. यात हजारो च्या संख्येने ओबीसी महिला व पुरुष उपस्थित होते. तसेच शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सहभाग,वणी पोलीस विभागाकडून चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते.
ओबीसींची जनगणना स्वतंत्र काँलममध्ये करण्यासाठी वणी उपविभागतील विशाल मोर्चा काढण्यात आला.यात शहरातील विविध समाज संघटनानी पाठिंबा देत स्वयंस्पृतीने महिला पुरुष व विध्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील नगरवाला जिनिंग, इथून दुपारी 12 वाजता मोर्चा सुरू होऊन शिवाजी चौक,खाती चौक ,गांधी चौक,भगतसिंग चौक , सुभाषचंद्र बोस चौक, सवोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक करीत शासकीय मैदानात समारोप करीत कृती समितीच्या वतीने सभा येण्यात अली.
ओबीसी कृती समिती अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार,मोहन हरडे, प्रा.मुळे, राजू तुरणकार, प्रवीण खानझोडे,व कृती समिती पदाधिकारी व समाज प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.सभेला कृती समितीच्या पदाधिकारी यांनी उपस्थित ओबीसी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना ओबीसी च्या विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.तसेच कृती समितीचे पदाधिकारी व आमदार यांच्या वतीने तहसीलदार शाम धनमाणे याना ओबीसीच्या मागण्या शासनाच्या दरबारी पोहचविण्यासाठी निवेदन देण्यात आले.



