◼️ ” ऐका हो उमेदवारांनो ” ………राजुर येथील वार्ड नं. 4,5,6 चे यंदा तरी विकासकामे WCL करणार की,ग्राम पंचायत ? आधी घ्या निर्णय मग लावा ! वोट दो.. वोट दो …नारे ? अशी नागरिकांची हाक
◼️ राजूर गावात ग्राम पंचायत निवडणुकीचे वारे
◼️ नवीन पंचायतीपुढे वार्ड क्र. 4,5,6 चे विकास करण्याचे आव्हान
वणी (1.डिसें.):- वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या राजुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वारे वाहू लागले आहेत. या गावातील लोकसंख्या 10,800 आहेत तर 17 सदस्यीय ग्रामपंचायत म्हणून खूप मोठे नाव सुद्धा आहे . म्हणतात ना, ” नाम बडे दर्शन छोटे “अशीच दयनीय अवस्था गावातील काही प्रभागाची आहे.यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत जवळपास 51 उमेदवारांनी नामनिर्देशक केले आहेत. एकूण राजूर गावात सहा प्रभाग आहेत. त्यात जवळपास वार्ड नंबर 1 मध्ये अंदाजे 1300 मतदार, नंबर 2 मध्ये अंदाजे 1500 मतदार,
नंबर 3 मध्ये अंदाजे 1400 मतदार, नंबर 4 मध्ये अंदाजे 1300 मतदार, वॉर्ड नंबर 5 मध्ये अंदाजे 1100 मतदार ,नंबर 6 मध्ये अंदाजे 1100 मतदार आहेत.असे एकूण 10,800 मतदार आहे.मात्र राजुर गावातील वार्ड क्रमांक. 4 मधील कित्येक वर्षापासून उमेदवार उभे राहत आहे व निवडूनही येतात परंतु त्या वार्डचे विकास मात्र “जैसे थे स्थिती” आहे.
याचे कारण जेव्हा, येथील ग्रामपंचायतीला विचारतात तेव्हा स्पष्ट सांगतात की, “वार्ड नंबर 4 हा डब्ल्यू .सी. एल अंतर्गत असल्याने कोणतीही योजना देता येत नाही.असे उडवा उडविचे उत्तरे देत आले आहे .”मागील पाच वर्षांपासून पाणी ,दिवे, रस्ते व घरकुल बिकट समस्याबद्दल अनेक असे निवेदन देऊनही त्यातील एक सुद्धा विकास ग्रामपंचायतने केलेला नाही .असे स्पष्ट येथील नागरिकांचा आरोप आहे.मग प्रश्न असा की मतदान का करावे ? आणि कोणाला करावे ? मग जर ग्रामपंचायत आपले हात झटकत असेल विकास कामासाठी तर येथे मतदान करण्याची गरज काय ? असा स्पष्ट आरोप इथे गावकरी करत आहे. वार्ड नंबर 4 ,5,6 मध्ये मतदार जेव्हा उमेदवाराला निवडून देतात फक्त विकासकाम करण्यासाठी निवडून देतात की, स्वतःचे खिशे भरून बसून राहन्यासाठी ?
असा प्रश्न गावकरी करत आहे.डब्ल्यूसीएल अंतर्गत असलेल्या वार्ड नंबर 4,5,6 या प्रभागाचा विकास ग्रामपंचायत व wcl ही करत नसेल तर नेमका कोण करणार ! मग जर करत नसेल तर मग यांचा वाली कोण ? Wcl सुद्धा वार्ड क्र 4,5,6 च्या प्रभागाच्या विकास कामाला दुर्लक्ष करीत आलेली आहे .काही समस्या खालील प्रमाणे आहे.
१) मागील 30 ते 40 वर्षापासून नागरिकांना जागेचे पट्टे का देण्यात आले नाही ? २) वार्ड क्र 4,5,6 ला विकास कामापासून वंचित का ठेवले आहेत ? ३) घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी मागील पाच वर्षांपासून जागा उपलब्ध करून दिली नाही असा सवाल नागरिक करत आहे.४) वार्ड नंबर 4 च्या रस्त्यासाठी निधीच्या पत्ताच नाही. महत्वाचे पाच वर्षापासून कोणतीही समस्या सुटलेली नाही तर इथे उमेदवार कशाला ? मत का द्यायचे ? आमचे मूल्यवान मत का व्यर्थ करावे का ? फक्त पाच वर्षानंतर नव-नवीन उमेदवार येतात व मोठमोठे आश्वासन देतात याचा अर्थ असा कि, दाखवू उमेदवार म्हणून उभे राहतात की काय,उभे राहणाऱ्या उमेदवारांना नावाची आवश्यकता आहे पण विकासाची काही गरज नाही असे दिसून येते.
यंदा तरी वार्ड नंबर 4,5,6 चे उमेदवार नावासाठी उभे राहणार ? कामासाठी उभे राहणार.?
कोण करणार वार्ड नंबर 4 विकासकामे? कोण घरकुल लाभार्थ्यांना जागा मिळून देणार ? कोण या ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देणार ? जो कोणी वार्ड नं 4 चे आव्हान स्वीकारणार त्यालाच मतदार निवडून देणार अशी चर्चा आहे, चला बघुया !! राजुर ग्रामपंचायतचा आखाडा!



