करूया नववर्षाचे स्वागत..
*करूया नववर्षाचे स्वागत*
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली :
लेखन- संगिता रामटेके गडचिरोली
करूया स्वागत नववर्षाच
माणसा माणसात वाद मिटवून
हेवेदावे ,राग ,मत्सर सर्व सोडूनी
राहू मानव प्राणी प्रेमाने गोविंदान
करूया स्वागत नव वर्षाचे
घेऊ भरारी उंच आकाशी
मन डोलती आनंदात काही
गाठू विचाराने प्रयाग काशी
करुया स्वागत नव वर्षाचे
प्रेरणा घेऊन साधू संताची
उज्ज्वल भविष्य घडवू आम्ही
देश रक्षण,हितार्थ वाटचालीची
करुया स्वागत नववर्षाचे
रोग ,जीवघेण्या महामारीवर
स्वच्छ तेचे सारे नियम पाळून
आरोग्य ठेऊ निरोगी सुदृढपरिवार
करुया स्वागत नववर्षाचे
करु महिला, मुलींचा आदरभाव
सुदृढ माता,सुदृढ होई बालक
आरोग्य संकल्पना समजून घेऊ राव
करुया स्वागत नववर्षाचे
कोर्ट कचेरीच्या लागू नका नादी
बेकार जाईल कमवलेला पैसा
समणझपणांने मिटवू यारे वादी
करुया स्वागत नववर्षाचे
जागवू नव विचार क्रांति
शिवाजी,विवेकानंद, युग पुरूष
तथागत बुद्ध आचरणात मिळे शांती
✍️संगिता रामटेके गडचिरोली



