लाच घेतला तर दनखा बसणारच..!
तो शासकीय अधिकारी ३ हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळयात
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
गोंदिया : जमिनीची मोजणी करून क प्रत देण्याकरिता ३ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना गोरेगांव जि. गोंदिया येथील उपअधिक्षक भुमि अभीलेख कार्यालयाताली नगर भूमापन लिपीक राजकपूर कचरू मेश्राम (५१) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे गोवारीटोला जि. गोंदिया येथील रहिवासी असुन ते जि.प्राथमिक शाळा येथे सहायक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे असलेल्या जमीनीची मोजणी करण्यासाठी तक्रारदराने २२ सप्टेंबर २०२० रोजी उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालय गोरेगाव येथे अर्ज करून त्याबात शासकीय शुल्क २ हजार रूपये चलनाव्दारे जमा केले. त्यावरून उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय गोरेगाव येथील नगर भुमापन लिपीक राजकपूर कचरू मेश्राम यांनी ठरल्यानुसार ७ डिसेंबर २०२० रोजी तक्रारदारच्या मुलाच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी करून दिली. त्यावेही त्यांनी खर्च पाण्याचे म्हणून तक्रारदाराकडे ५ हजार लाच रकमेची मागणाी केली त्यावर तक्रारदाराने त्यांना मोजणीचे शासकीय शुल्क भरल्याचे सांगुण रक्कम कमी करण्याची विनंती केली असता त्यांनी १ हजार रूपये कमी करून ४ हजार रूपयेची मागणी केली अन्यथा क प्रत देणार नाही असे म्हटले, त्यानंतर तक्रारदार हे क प्रत घेण्याकरिता उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय येथे गेले असता नगर भूमापन लिपीक राजकपुर मेश्राम यांनी तक्रारदारास क प्रत देण्याकरिता ४ हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्ररदारासत नगर भुपामन लिपीकास लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया चे पोलिस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांनी तक्रारदाराकडे दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहनिशा करून लिपीक राजकपुर मेश्राम यांच्या विरूध्द सापळा कारवाईचे आयोजन केले त्यामध्ये पडताळणीअंती काल २९ डिसेंबर २०२० रोजी उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय गोरेगाव येथील राजकपुर कचरू मेश्राम यांनी तक्रारदाराचे मुलाला क प्रत देण्याकरिता ३ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्या विरूध्द पोलिस स्टेशन गोरेगांव जि.गोंदिया येथे भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ओ.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, सफौ शिवशंकर तुंबळे, नापोशि रंजीत बिसेन, डिगांर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन व चालक नापोशि देवानंद मारबते यांनी केली.



