राजुर येथे उमेदवारांसाठी धड़पकड सुरु…… गावात लोकशाही की एकेशाही…मतदार राजा करेल विचार ?
वणी (29 डिसें ):- तालुक्यातील राजुर येथील ग्रामपंचायत ही वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे तसेच हा गाव मिनी इंडिया म्हणून सुद्धा गाजलेला आहे . कारण येथे बहुजातिचे व परप्रांतीय लोक वसलेले आहे. राजुर येथे संभाव्य उमेदवारांचे खऱ्या अर्थाने कसरत चालू झाली आहे .
राजुर गावातील पुढारीं कडून उमेदवाराची धड़पकड़ सुरु आहे,अशी चर्चा आहे. मतदार राजांसमोर महत्वाचा प्रश्न असा की,गावाचा विकास किती करता येईल ! ह्यावर निवडणूक नवखे उमेदवार लडविणार की, सरपंच बनन्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ! अशी चर्चा गावात मतदारांकडून सुरु आहे.
मात्र सरपंच कोण ? हे मात्र गुलदसत्यातच .! स्वछ प्रतिमा तसेच गावाच्या विकासाकरिता कार्य करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात सर्वच गटातील गावपुढारी भटकत आहे.सर्वांनाच सरपंच होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. गावाच्या विकासाचा विचार करून निवडणूक लढवावी असे कुणाच्याच तोंडून ऐकला मिळत नाही.राजुर येथील निवडणूक स्व-विकास की ,गाव विकास ? येणारे काही दिवसात नक्की दिसणार अशी चर्चा गावकरी करत आहे.
आता राजुर येथे पँनलवर खर्च कोण करणार स्वतः उमेदवार की त्यांचे ठेकेदार ? हे सुद्धा नवीन बाब यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे ? राजुर येथील नेते हे दर पंचवार्षिक निवडणूक आली की काका ,मामा म्हणन्यास सुरूवात करतात व नंतर 5 वर्षे तोंड़ दाखवित नाही व काही कामे सांगितले की, पाठ दाखवून जातात अशी जोरदार चर्चासत्र गावात होतांना दिसत आहे.म्हणूनच म्हणतात की,”राजुर हे गाव राजकारणात अव्वल व विकासात मात्र खो…..अशी म्हण सर्वत्र आहे.”
राजुर गावाची परिस्थिति सध्या संभ्रम अवस्थेत असल्याने कोणता उमेदवार निवडून आणायचे हेही मतदार राजाला नक्कीच ठाऊक आहे. मात्र ,राजुर येथे विकास क़ाय झाला व किती झाला यापेक्षा आपले ग्रामपंचायत मधे वर्चस्व कसे गाजवता येईल !
याकडे आजी माजी नेते समाज व जातीचे समीकरण जोड़तांना दिसून येतांना दिसत आहे.विकास करणारा उमेदवार महत्वाचा की, वर्चस्व गाजविणारा उमेदवार ? अशी जोरदार टक्कर राजुर गावच्या निवडणुकीत दिसणार आहे ,अशी चर्चा आहे.