राजुर ग्रामपंचायत निवडणुकीत” कुणी वर्चस्व गाजविन्याच्या तयारीत ………… तर नवखे तरुण उमेदवार मोठ- मोठे आश्वासने देण्यासाठी सज्ज ……..
वणी ( 26 डिसें.):- राजुर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातुन 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला “मिनी मंत्रालयाला ” यात्रेचे स्वरुप आले असुन या राजकीय आखाड्यातुन नव नेतृत्व भवितव्य आजमावण्यासाठी तरुण पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.
♦
कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या निवडणूका केव्हा होतील याकडे ग्रामीण भागातील इच्छुकाचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायत निवडणूक तारीख जाहीर होताच तरूणांना, आजी -माजी नेत्यांमध्ये नवचैतन्य आले असून जो तो” मी निवडणूक “लढवणार असे गावातील इच्छुक तरूण बोलू लागले व आजी माजी मी पुन्हा येईल च्या बट्याबोड करू लागले. सध्याचा परिस्थीतीत गावात पारावर,चौकात, हाँटेलात निवडणुकीत कोण कोण जिंकनार? ,कोणता प्रभाग कोणास सरस ठरणार ? याची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस निवडणुकीतील राजकीय रंगत वाढत असल्याने गावगाड्याची रणभूमी तापू लागली आहे.या निवडणुकीत तरुणांनाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
वणी तालुक्यातील राजुर हे मोठे गाव व मोठी ग्रामपंचायत असून येथील निवडणूक अनेक वेळा चुरशीची झाली असून यावेळीच्याही निवडणूकीतील लढत रंगतदार होणार का ? ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून निवडणूक तोंंडावर आल्याने गावात रात्री उशिरापर्यंत निवडणुकांच्या बैठका होत असुन उमेदवार निवडीत पँनल प्रमुखाची दमछक होताना दिसुन येत आहे.
नवीन कायद्यानुसार गावच्या विकासासाठी येणाऱ्या एकूण निधीच्या 70 टक्के निधी खर्च करण्याचा अधिकार सरपंचांना असुन पूर्वीपेक्षा जादा निधी ग्रामपंचायातीला शासनाकडून सरळ वर्ग होणार असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी इच्छुकात स्पर्धा लागली असली तरी गावातील पुढारी मात्र नवीन चेहऱ्याना व मर्जित रहाणार्यांना निवडणुकीत उतरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.राजुर या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकिची चुरस लागली आहे.यावेळीचे संरपच पदाचे आरंक्षन गुलदस्त्यात असल्याने गावातील राजकीय पुढारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारले असून निवडणूक लढवणारे इच्छुक मात्र एकमेकांशी आदर भावाने वागू लागले आहेत.
त्यामुळे प्रत्येक नागरिकांना या निवडणुकीत रस निर्माण झाला असून यावेळीच्या निवडणुकीतल उमेदवार हे मात्र प्रत्यक्ष निवडणूक फाँम भरल्यानंतर कळणार असल्याने याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.आता तरी राजुर ह्या गावाच्या मोठ्याप्रमाणात विकास कोण करणार ? अशी चर्चा गावात सुरु असल्याचे दिसून येत आहे. उमेदवार आप आपल्या नवीन वोटिंग बैंककड़े लक्ष वेधून आहे.राजुर गाव विकासापासून मात्र दूर ही चिंतेची बाब मात्र सत्य ……




